शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेसाठी ३१५ कोटीचा विकास निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:45 IST

नागरी सुविधांना चालना : प्रभागनिहाय प्रकल्पांना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेसाठी तब्बल ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, उद्याने आणि प्रकाश व्यवस्थेच्या विकासकामांना वेग येणार आहे. नगरविकास विभागाच्या शासन आदेशानुसार या निधीची तरतूद अधिसूचित नागरी सुविधा उभारणीसाठी करण्यात आली आहे.

महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहराच्या गरजांचा सविस्तर विकास आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी देत राज्य सरकारने निधी वाटपाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, मंजूर निधीतून प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनचे बदल, नव्या ड्रेनेज लाईन्स टाकणे, तसेच उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित करणे यासारखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येतील. याशिवाय स्मार्ट लाइटिंग प्रकल्प, स्वच्छता केंद्रे, सार्वजनिक शौचालये, आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणा सुधारणा या प्रकल्पांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या कामांसाठी स्वतंत्र आराखडे तयार केले असून, पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी तांत्रिक तपासणी पथक स्थापन करण्याचे नियोजन आहे.

विशेषतः पूर्व आणि उत्तर नागपूरसह इतर भागातील जलनिस्सारण आणि पाणीपुरवठा समस्या प्राधान्याने सोडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पश्चिम नागपूरमधील वाहतुकीतील अडचणी दूर करण्यासाठी काही प्रमुख चौकांचे पुनर्रचना आराखडेही तयार केले गेले आहेत.

"या निधीमुळे शहरातील विकास आराखड्याला नवी गती मिळणार आहे.नागपूर महानगरातील नागरी सेवांची पायाभूत स्थिती सुधारण्यास ही तरतूद मोलाची ठरेल. प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचाव्यात हे आमचे उद्दिष्ट आहे. या निधीचा उपयोग पारदर्शकपणे करून वेळेत काम पूर्ण करणे हाच आमचा संकल्प आहे. "- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Municipal Corporation Receives ₹315 Crore Development Fund Approval

Web Summary : The Maharashtra government approved ₹315 crore for Nagpur's development. Funds will improve roads, water supply, drainage, sanitation, parks, and lighting. The project will prioritize water and drainage issues in East and North Nagpur and revamp key intersections in West Nagpur.
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे