शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:07 PM

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात केंद्रीय मार्ग निधी(सीआरएफ)मधून २० विकास प्रकल्प होत आहेत. यासाठी १८८२ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या असून नऊ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देप्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात केंद्रीय मार्ग निधी(सीआरएफ)मधून २० विकास प्रकल्प होत आहेत. यासाठी १८८२ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या असून नऊ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलमध्ये आयोजित बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरण, महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे, महसूल विभागासह अन्य विभागांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार,आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, विभागीय आयुक्त संजीव कुमार,जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.राज्य शासनाने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आठवडाभरात जमीन अधिग्रहण व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार कामाला गती द्या, महाल येथील बुधवार बाजाराच्या निविदा सात दिवसात काढा, तसेच सक्करदरा येथील बुधवार बाजाराचा आराखडा सात दिवसात सादर करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.यशवंत स्टेडियमच्या जागेवर नवीन अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यात परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शोध व प्रशिक्षण संस्था यासह अन्य प्रकल्पांची फाईल मंजुरीसाठी राज्य सरकाकडे पाठविली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी नासुप्र, टिळक पत्रकार भवन, एसआरए, महापालिका व लायब्ररी यांची संयुक्त बैठक घेऊ न जागा अधिग्रहित करण्याची सूचना गडकरी यांनी केली. टेकडी मंदिर उड्डाणपूल पाडून येथील परिसराचा विकास केला जाणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाची दीड एकर जागा घेतली जाणार आहे. या मोबदल्यात संरक्षण मंत्रालयाला अहमदनगर येथील जागा उपलब्ध करण्यात येईल. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांनी पुनर्वसनासाठी सहमती दर्शविली आहे. मेट्रो रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकु लात त्यांना जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.उपलब्ध निधीतून विकास कामेपारडी उड्डाणपूल, इंदोरा ते अशोक चौकपर्यंत उड्डाणपूल, दिघोरी ते नागपूर शहराच्या सीमेपर्यंत रस्त्यांचे निर्माण, रिझर्व बँक चौक ते गड्डीगोदाम ते टेका नाकापर्यंत उड्डाणपूल व अंडरपास, जुना भंडारा रोड, केळीबाग रोड, गणेश टेकडी मार्ग, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट नव्याने विकसित करणार आहे.बाधितांना लीजवर दुकानेमहाल येथील रस्ते विकासामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांना ३० वर्षांच्या लीजवर भाड्याने दुकाने उपलब्ध करण्यात येतील. महाल येथे उभारण्यात येणाऱ्या बुधवार बाजारात जागा दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका