शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:30 IST

समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : सीमा सलीमखाँ पठाण यांना सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सीमा सलीमखाँ पठाण यांना शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका डॉ. जुल्फी शेख, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रकाश कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते. डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या, समाजातील लहान व्यक्तींना पुढे आणून त्यांना संधी देणे हे गिरीश गांधी यांचे महत्त्वाचे काम आहे. सीमाला आकाशाएवढे होण्याची हिंमत त्यांनीच दिली. ज्याच्यात स्फूर्ती आहे, तोच जीवनातील चढ-उतार काव्यातून पकडू शकतो. त्यासाठी गुरूचे अधिष्ठान मानावे लागते. कवितेला समजणे आवश्यक आहे. सुलभा हेर्लेकर यांनी मुक्त रचना केल्या. ज्याच्या हृदयात कळ नाही, पेटून उठण्याचा वणवा नाही तो कविता करूच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, सुलभा हेर्लेकर मोठ्या मनाच्या कवयित्री होत्या. त्यांनी आपल्यासोबतच्या कवयित्रींचे कौतुक तर केलेच, परंतु नवोदितांनाही संधी देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा पुरस्कार नवोदित कवींना देण्याचे ठरले. सीमाने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सुलभा हेर्लेकर, जुल्फी शेख यांचा आदर्श पुढे ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांनी प्रतिभावंतांची समाजाने दखल घेण्याची गरज असल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्या कार्याचे कौतुक केले. सीमा पठाणने आपल्या विचारांना शब्दाचे रूप देऊन साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केल्याचे सांगून, तिच्या कामगिरीचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना सीमा पठाण यांनी मोहम्मद असदुल्लाह यांनी हिंमत दिल्यामुळे पुढे येऊ शकल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्यामुळे नवी दिशा मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मो. सलीम शेख यांनी केले. संचालन आणि आभारप्रदर्शन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर