डेव्हलपर्सला बंधक बनवून मारहाण
By Admin | Updated: September 10, 2015 03:24 IST2015-09-10T03:24:39+5:302015-09-10T03:24:39+5:30
जमिनीच्या व्यवसायात गुंतवणूक केलेले ७० लाख रुपये परत मागण्यावरून एका डेव्हलपर्सला बंधक बनवून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

डेव्हलपर्सला बंधक बनवून मारहाण
नागपूर : जमिनीच्या व्यवसायात गुंतवणूक केलेले ७० लाख रुपये परत मागण्यावरून एका डेव्हलपर्सला बंधक बनवून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीमुळे भयभीत डेव्हलपर्सने दोन दिवसानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर घटनेतील मुख्य सूत्रधार भालचंद्र धोटे (४८) रा. भरतनगर अमरावती रोड फरार आहे. श्रीनिवासन राजगोपालन (४८) रा. आदित्य अपार्टमेंट हिल रोड अंबाझरी असे पीडित डेव्हलपर्सचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार धोटे याचा भरतनगर येथे एक प्लॉट आहे. येथे त्याचे कार्यालय व निवासही आहे. धोटेने श्रीनिवासनसोबत आपल्या प्लॉटवर कॉम्प्लेक्स उभारण्याचा करार केला. करारानुसार श्रीनिवासन यांना जागेवरच बांधकाम करायचे होते. धोटेने बँकेत प्लॉट गहाण असल्याचे सांगितले. बँकेतून मंजुरी मिळाल्यावरच कामाला सुरुवात होऊ शकेल, असेही स्पष्ट केले. यासाठी त्याने श्रीनिवासन यांना बँकेत जमा करण्यासाठी ७० लाख रुपये मागितले. श्रीनिवासन यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून धोटे यांच्या खात्यात पैसे जमा केले. परंतु धोटेने हा पैसा स्वत: वापरला.