दुर्लक्षित भागाचा विकास करणार
By Admin | Updated: October 13, 2014 01:11 IST2014-10-13T01:11:28+5:302014-10-13T01:11:28+5:30
पूर्व नागपुरात विशिष्ट्य भागाचा विकास झाला आहे. बहुतांश भाग हा अद्यापही अविकसित असून, अशा दुर्लक्षित भागाच्या विकासाला प्राधान्य देणार.

दुर्लक्षित भागाचा विकास करणार
नागपूर : पूर्व नागपुरात विशिष्ट्य भागाचा विकास झाला आहे. बहुतांश भाग हा अद्यापही अविकसित असून, अशा दुर्लक्षित भागाच्या विकासाला प्राधान्य देणार.
पूर्वचा भाग बहुतांश भाग हा झोपडपट्टीबहुल आहे. मात्र स्लमच्या नावाखाली येणाऱ्या निधीचा उपयोग येथे होत नाही. त्याचबरोबर आरक्षित भूखंडाचा प्रश्न या भागात मोठा आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. आरक्षित भूखंडामुळे प्रशासन विकासकामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे येथील नागरिक मूलभूत सोयींपासून वंचित आहे. अशा अविकसित वस्त्यांचा विकास व आरक्षित भूखंडांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन पूर्व नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांनी दिले. रविवारी अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ डिप्टी सिग्नलमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पुंजराम बारी, वैरागडे वाडी, दुर्गा मंदिर, नागराज चौक, बजरंग चौक, गिल्लोर चौक, शितलामाता मंदिर, बाजार चौक, संतोषी नगर, उडता हनुमान चौक, जानकीनगर, मिनीमातानगर, राजीव गांधी स्कूल, पाचझोपडा येथील जनतेशी संपर्क साधला. पदयात्रेला वंजारी यांच्यासोबत छोटू निर्मलकर, दयाशंकर गिल्लोर, सेवकरामजी शाहू, गणेश शाहू, एम.एम.शर्मा, विष्णू बनपेला आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)