नागपूरचा मेडिकल हब म्हणून विकास करणार; नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 21:57 IST2022-01-03T21:57:09+5:302022-01-03T21:57:36+5:30
Nagpur News नागपुरात शेजारील तीन-चार राज्यांमधून रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे नागपूरचा आता मेडिकल हब म्हणून विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूरचा मेडिकल हब म्हणून विकास करणार; नितीन गडकरी
नागपूर : नागपुरात शेजारील तीन-चार राज्यांमधून रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे नागपूरचा आता मेडिकल हब म्हणून विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. एका खासगी इस्पितळाच्या हवेतून प्राणवायू तयार करण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहरात अनेक गजबजलेल्या भागात रुग्णालये आहेत. तेथे आरोग्य सुविधांचा पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नासुप्रला चार हजार रुग्णशय्या पडतील, अशी जागा मागितली आहे. तेथे सर्व अद्ययावत सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहेत. परराज्यातून येणाऱ्या रुग्णांनाही याचा फायदा होईल. यासोबतच सर्वच अवयवांचे प्रत्यारोपण कमी दरात उपलब्ध करण्याचेही प्रयत्न केले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.