देवा शिर्केची भाईगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:09+5:302020-12-30T04:13:09+5:30
नागपूर : पिस्तुलाचा धाक दाखवून पानटपरीचालकाला १० हजाराची खंडणी मागणाऱ्या देवेंद्र देर्फ देवा शिर्के (वय ४५) या गुंडावर सक्करदरा ...

देवा शिर्केची भाईगिरी
नागपूर : पिस्तुलाचा धाक दाखवून पानटपरीचालकाला १० हजाराची खंडणी मागणाऱ्या देवेंद्र देर्फ देवा शिर्के (वय ४५) या गुंडावर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवा शिर्के वादग्रस्त असून तो सुर्वे ले-आऊटमध्ये राहतो.
मंगेश दिगांबर काकडे (वय ३४, रा. राजे रघुजीनगर, छोटा ताजबाग) यांचे ताजबाग चाैकात महेश पान पॅलेस आहे. २५ डिसेंबरच्या दुपारी मंगेश आणि त्याचा आतेभाऊ विक्की कांबळे पानटपरीवर असताना आरोपी शिर्के तेथे आला. त्याने मंगेशला प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मागणी केली. नकार दिला असता
कंबरेत खोचलेले पिस्तुल दाखवून अश्लील शिवीगाळ करीत काकडेला १०हजाराची खंडणी मागितली. येथे पानठेला चालवायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल,अन्यथा जिवे मारेन, अशीही धमकी त्याने दिली. मंगेश काकडेने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ते कळताच तो फरार झाला.
----
पोलिसांकडून शोधाशोध
शिर्केचा गुन्हेगारी अहवाल आहे. तो बिल्डर म्हणूनही ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याने खंडणीबाज मंगेश कडवविरुद्ध तक्रार नोंदवली होती. मंगेशने लाखोंची रक्कम घेतल्याची देवा शिर्केची तक्रार होती. त्यावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी कारवाईदेखील केली होती. आता शिर्केचाच पोलीस शोध घेत आहेत.
----