शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी उपसंचालक नरड, नाईक सायबर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:30 IST

दोन दिवस होणार चौकशी : आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक उल्हास नरड तसेच वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. मुख्याध्यापक बोगस मान्यता प्रकरणात हे दोघेही कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची दोन दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे व त्यातून शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार केली. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. यातील ३१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 'शालार्थ आयडीं'ना उपसंचालक कार्यालयाने मान्यता दिली होती. 

उर्वरित 'शालार्थ आयडी'ची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. नरड यांनाच अपात्र मुख्याध्यापकाचा 'शालार्थ आयडी' तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांना नरड व नाईक यांचा ताबा हवा होता. पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर दोघांनाही ताब्यात घेतले.

पासवर्डचा गैरवापर झालाच कसा?सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार झाली होती. 'शालार्थ आयडी' निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून 'शालार्थ आयडी' तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. मात्र, नरडच्या पासवर्डचा त्यांच्या माहितीशिवाय गैरवापर झालाच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या दिशेने सविस्तर चौकशी करणार आहेत.

२४४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

  • दरम्यान उल्हास नरड यांना अटक झाल्यानंतर शिक्षण विभागात पूर्वीपासून सुरू घोळाची प्रकरणे बाहेर येत आहेत. नरड पदावर आल्यानंतर पूर्वीच्या उपसंचालक वैशाली जामदार यांच्या काळात झालेल्या अशा प्रकरणांच्या तक्रारी झाल्या व त्या प्रकरणांची चौकशी नरड यांच्याकडे आली होती.
  • यामध्ये जिल्ह्यातील २० हून अधिक शाळांमध्ये २११ शिक्षक, २ मुख्याध्यापक आणि ३१ लिपिकांच्या नियुक्तीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत होते. नरड यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांना ३ मार्च २०२५ रोजी पत्र पाठवित या २४४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सादर करण्यात आलेली वैयक्तिक मान्यतेची मूळ नस्ती, शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या दुय्यम शालार्थ प्रस्तावाची प्रत, जावक नोंदवहीची प्रत आणि उपसंचालक कार्यालयाने निर्गमित केलेल्या शालार्थ आदेशाची मूळ प्रत तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. या २४४ कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांची पुन्हा चौकशी होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण