उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:07 IST2021-02-07T04:07:53+5:302021-02-07T04:07:53+5:30

नागपूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार हे रविवार ७ व सोमवार ८ फेब्रुवारी रोजी नागपूर दौऱ्यावर ...

Deputy Chief Minister Ajit Pawar on a two-day visit to Nagpur | उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

नागपूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार हे रविवार ७ व सोमवार ८ फेब्रुवारी रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. ७ फेब्रुवारीला ते नागपूर येथील विविध कार्यक्रमात सहभागी होतील तर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा विकास आराखड्यांच्या राज्यस्तरीय बैठकी घेणार आहेत.

रविवारी ३ वाजता अजित पवार यांचे नागपूर येथे आगमन होणार आहे. देवगिरी येथे त्यांची वेळ राखीव असून दुपारी ४ वाजता नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मीट द प्रेस', कार्यक्रमात सहभागी होतील. सायंकाळी ५ वाजता मुदलीयार चौक शांतीनगर येथे पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. येथे अपक्ष नगरसेविका आभा पांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. यानंतर गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयातही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल.

सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात डीपीसीची राज्यस्तरीय बैठक होईल. या बैठकीत विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा अशा अनुक्रमाने जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar on a two-day visit to Nagpur