शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी नागपूरला २ हजार ५७८ नवीन पोलिस पदे हवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:36 IST

Nagpur : हायकोर्टाने विचारले, गृह विभागाचा निर्णय काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांना न्याय देण्याकरिता नागपूरपोलिस आयुक्तालयाला ३९१, तर नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला २ हजार १८७ नवीन पदांची गरज आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या २८ एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले. 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नागपूर पोलिस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ कार्यरत असणे आवश्यक आहे. सध्याच्या पोलिस बलामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे, असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत २२ पोलिस ठाणे व ६ उप-विभाग, तर पोलिस आयुक्तालयांतर्गत ३६ पोलिस ठाणे व ५ उप-विभाग कार्यरत आहेत. ग्रामीणच्या २ हजार १८७ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक २३४ कोटी १५ लाख ६५ हजार २५६ रुपये, तर शहराच्या ३९१ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक १७कोटी ९ लाख १७ हजार ३२० रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गृह विभागाला सांगितले. 

शहरात आवश्यक पदे

  • सहायक उपनिरीक्षक - ०६
  • पोलिस हेड कॉन्स्टेबल - ४२
  • पोलिस कॉन्स्टेबल - २०७
  • पोलिस अंमलदार - १३६

ग्रामीणला आवश्यक नवीन पदे

  • पोलिस निरीक्षक - १६
  • सहायक पोलिस निरीक्षक - ३७
  • पोलिस उप-निरीक्षक - १५८
  • सहायक पोलिस उप-निरीक्षक - २४६
  • पोलिस हवालदार - ६९१
  • पोलिस शिपाई - १०३९

जनहित याचिका प्रलंबित

  • रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
  • अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे.
  • याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर