शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नागपुरातील ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; फक्त १२ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:16 IST

Nagpur Assembly Vidhan Sabha Election 2024 Result : अपक्षदेखील ठरले प्रभावहीन ; सर्वांत कमी मतांचा आकडा '३१'

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांत यंदा तब्बल ११७ उमेदवार रिंगणात होते. मात्र सहाही मतदारसंघांतून १२ उमेदवार वगळता एकालाही डिपॉझिट वाचविण्यात यश आले नाही. विशेषतः गाजावाजा करत रिंगणात उतरलेल्या अपक्ष किंवा बंडखोरांनादेखील अपेक्षित मते मिळाली नसल्याने त्यांच्या एकूणच भूमिकेकडे जनतेने पाठच फिरविल्याचे चित्र दिसून आले. मतांचा सर्वांत कमी आकडा ३१ इतका ठरला.

नागपुरातील सहाही मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी व बसपाच्या उमेदवारांकडून बऱ्यापैकी मते घेण्यात येतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्यातील २१ ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दुसरीकडे नागपुरातून आभा पांडे, पुरुषोत्तम हजारे यांनी गाजावाजा करत अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केली होती व ते प्रस्थापित उमेदवारांची मते घेतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होता. मात्र यांच्यापैकी एकालाही १५ हजारांचा आकडादेखील गाठता आला नाही. नागपुरात एकूण ४८ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. सर्वच अपक्षांचेदेखील डिपॉझिट जप्त झाले. पश्चिम नागपुरातील नरेंद्र जिचकार (८,१६६), पूर्व नागपुरातील पुरुषोत्तम हजारे (११,३५९), आभा पांडे (९,४०२) यांना आठ हजारांचा टप्पा गाठता आला. परंतु त्यांनादेखील डिपॉझिट वाचविता आले नाही. 

२६ टक्के अपक्ष शंभराच्या आत नागपुरातील ४९ पैकी २६ टक्के (१३) अपक्षांचा शंभर मतांच्या आत गाशा गुंडाळल्या गेला. त्यातही काही जणांना पन्नाशीदेखील गाठता आली नाही. सर्वात कमी मतांचा आकडा ३१ इतका ठरला, १२ जणांना १०१ ते २०० दरम्यान मते मिळाली, तर १२ जणांना २०१ ते ३०० दरम्यान मते पडली. प्रत्येकी एका उमेदवाराला ३०१ ते ४०० तसेच ४०१ ते ५०० मते मिळाली. केवळ पाच अपक्षांना हजाराच्या वर जाता आले.

कोणाचे जप्त होते डिपॉझिट आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी १/६ (सरासरी) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. ज्या प्रमाणात अपक्ष रिंगणात होते, त्यावरून काही प्रमाणात मत विभाजन होईल व त्याचा फटका प्रमुख पक्षांना बसेल असा अंदाज होता मात्र, या उमेदवारांना मिळालेली मते पाहता तसे झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

डिपॉझिट जप्त उमेदवार दक्षिण-पश्चिम नागपूर  - १०दक्षिण नागपूर  - २०पूर्व नागपूर  - १५मध्य नागपूर  - १८ पश्चिम नागपूर - १८उत्तर नागपूर  - २४

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Electionनिवडणूक 2024Votingमतदानnagpurनागपूर