जिल्हा बँकेच्या २0५९ कोटींच्या ठेवी बुडणार

By Admin | Updated: May 29, 2014 03:28 IST2014-05-29T03:28:07+5:302014-05-29T03:28:07+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने १६ मे २0१४ रोजी वर्धा, बुलडाणा व नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे ...

The deposits of the District Bank of 20.59 crore will be submerged | जिल्हा बँकेच्या २0५९ कोटींच्या ठेवी बुडणार

जिल्हा बँकेच्या २0५९ कोटींच्या ठेवी बुडणार

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने १६ मे २0१४ रोजी वर्धा, बुलडाणा व नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहे. या बँकांमध्ये शेतकरी, जिल्हा परिषद व पतसंस्थांच्या जवळपास २0५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या बँकांवर लिक्वीडेटर बसण्याची शक्यता असून, असे झाल्यास २0५९ कोटी रु पयांच्या ठेवी बुडणार असल्याची शक्यता भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत तिगावकर यांनी पत्रपरिषदेत वर्तविली.

१५ मे २0१२ रोजी रिझर्व्ह बँकेने या तीनही बँकेला नोटीस बजावली होती. बँकांनी वसुली करून राज्य शासनाची मदत घेऊन बँकेची परिस्थिती दुरुस्त करायला हवी होती. आज रिझर्व्ह बँकेने तीनही बँकेचे व्यवहार ठप्प केल्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ जागे झाले आहे. तीनही बँकेचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी शेअर कॅपिटलच्या स्वरूपात ३१९ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने परवाना देण्याला नकार दिल्यामुळे तीनही बँका रिझर्व्ह बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेल्या आहेत. उच्च न्यायालयात जरी व्यवहाराला मंजुरी मिळाली तरीही ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी बँकेकडे तगादा लावणार आहे. आज तीनही बँकेकडे शेतकर्‍यांच्या १७१६ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेची १५९७ कोटींची वसुली बाकी आहे. या तीनही बँका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यात झालेले घोटाळे सर्वश्रुत आहेत. घोटाळे करणार्‍यांकडून जोपर्यंंत वसुली होणार नाही तोपर्यंंत बँका वाचू शकत नाही. वर्धा, बुलडाणा बँकेने सुतगिरण्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांना करोडो रुपयांचे वाटप केले आहे. त्यांची वसुली होणे शक्य नाही. तर न्यायालयाने आदेश देऊनही आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे जोपर्यंंत राज्य सरकार २000 कोटी रुपयांची मदत बँकेला करणार नाही तोपर्यंत बँका चालू शकणार नाही, असे तिगावकर म्हणाले.

जालना, धुळे व नांदेड बँकेला जशी सरकारने मदत केली, त्याच धर्तीवर विदर्भातील बँकेला केली असती, तर बँका डबघाईस आल्या नसत्या. या तीनही बँकेत दोन हजार कोटींवर ठेवी बुडणार असतानाही महाराष्ट्र सरकार कुठलीही कारवाई करीत नाही. यात दोषी असलेल्या महाराष्ट्र सरकार विरोधात ठेवीदार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे तिगावकर म्हणाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The deposits of the District Bank of 20.59 crore will be submerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.