हद्दपार आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:54+5:302021-02-11T04:09:54+5:30

कामठी : हद्दपार करण्यात आलेला आराेपी शहरात तलवारीसह फिरत असल्याची माहिती मिळताच नवीन कामठी पाेलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक ...

Deported RAP arrested | हद्दपार आराेपी अटकेत

हद्दपार आराेपी अटकेत

कामठी : हद्दपार करण्यात आलेला आराेपी शहरात तलवारीसह फिरत असल्याची माहिती मिळताच नवीन कामठी पाेलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई साेमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

माेहम्मद शाहीद एजाज अन्सारी (३६, रा. वारिसपुरा, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. गुंड प्रवृत्तीच्या या आराेपीवर नवीन व जुनी कामठी पाेलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असून, पाेलीस यंत्रणेने त्यास हद्दपार केले आहे. दरम्यान, साेमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील ईदगाह क्रीडांगण परिसरात हाती तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे नवीन कामठी पाेलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सापळा रचून आराेपीस ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडील तलवार पाेलिसांनी जप्त केली. याप्रकरणी नवीन कामठी पाेलीस ठाण्यात ४/२५ आर्म ॲक्ट, सहकलम १३५, १४२ नुसार गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय मेंढे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, आशिष यांच्या पथकाने केली.

Web Title: Deported RAP arrested