शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश ‘रॅकेट’ची होणार विभागीय चौकशी

By admin | Updated: February 26, 2016 02:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ उघडकीस आल्यानंतर वित्त विभागासह संपूर्ण प्रशासन हादरले आहे.

नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेची बैठक तापलीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ उघडकीस आल्यानंतर वित्त विभागासह संपूर्ण प्रशासन हादरले आहे. सुरुवातीला केवळ बँकेकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या प्रशासनाला आता मात्र विद्यापीठातदेखील याची ‘लिंक’ आहे की काय असा प्रश्न पडायला लागला आहे. यासंदर्भात अंतर्गत विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधात गुरुवारी बोलविण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत न्यायालयीन चौकशीच्या मागणीवरून काही सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.अनोखळी व्यक्तीने नागपूर विद्यापीठाच्या ‘बँक आॅफ इंडिया’च्या खात्यातून बनावट धनादेशाच्या माध्यमातून ३१ लाख रुपयांची रक्कम काढली. हा प्रकार उघडकीस येऊन अवघे २४ तासदेखील झाले नसताना वित्त विभागाला आणखी एक झटका बसला. रूपेश रणदिवे या कंत्राटदाराच्या नावाने तयार झालेले दोन लाख तीन हजारांचे दोन धनादेश परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीने विभागातून नेले आणि ते वटविले. अगोदरच ३१ लाख रुपयांच्या प्रकरणात विद्यापीठाचे तोंड पोळले असताना ही बाब समोर आल्यामुळे अधिकारी अक्षरश: हादरले. गुरुवारी विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली व विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चौकशी बाहेरील व्यक्तींकडून करविण्यात येईल व यात वित्त तज्ज्ञ, बँकेतील जेष्ठ अधिकारी, चार्टर्ड अकाऊन्टंट, वित्त विश्लेषक आणि अधिकारी पातळीवरील व्यक्तींचा समावेश राहणार आहे. नेमकी कुठे चूक झाली, प्रक्रियेत काय त्रुटी होत्या व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर या चौकशीचा भर असेल. या समितीमधील व्यक्तींच्या निवडीचे अधिकार मला देण्यात आले आहेत, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.