शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डेंटलच्या विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:13 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) अधिष्ठाता विद्यार्थ्यांना वारंवार मागत असलेल्या पत्राला घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला. या प्रकारामुळे खळबळ उडून काही प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

ठळक मुद्देअधिष्ठात्यांच्या पत्राच्या मागणीवर विद्यार्थी संतप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) अधिष्ठाता विद्यार्थ्यांना वारंवार मागत असलेल्या पत्राला घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला. या प्रकारामुळे खळबळ उडून काही प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली होती. उद्या शनिवारी यावर अधिष्ठात्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे.डेंटलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र अशी सोय नाही. यामुळे अनेक विद्यार्थी लायब्ररीमध्येच अभ्यास करतात. पूर्वी ही लायब्ररी रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरू रहायची. परंतु आता मनुष्यबळ नसल्याने सायंकाळी ५ वाजताच लायब्ररी बंद होते. गेल्या काही दिवसांपासून लायब्ररीचे नुतनीकरणाचे कामही सुरू होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ आणि नुतनीकरणाचे काम एकाच वेळी सुरू असायचे. आज ना, उद्या काम संपेल या अपेक्षेवर विद्यार्थी निमूटपणे अभ्यास करायचे. परंतु अचानक चार-पाच दिवसांपूर्वी नुतनीकरणाचे काम थांबविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना विचारणा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भातील पत्र देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी पत्र दिले. परंतु चार दिवस होऊनही पत्राचे उत्तर मिळाले नाही. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी नुतनीकरणाचे काम कधी सुरू होईल व कधी संपेल याबाबत पुन्हा विचारणा केली असता अधिष्ठाता डॉ. फडनाईक यांनी पुन्हा पत्राची मागणी केली. यावर विद्यार्थी संतापले. इंटर्नपासून सर्व विद्यार्थी एकत्र आले. दुपारी ४ वाजेपर्यंत चांगलाच गोंधळ घातला. अखेर डॉ. फडनाईक यांनी त्यांची समजूत घालून शनिवारी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे सध्यातरी हे प्रकरण निवळले असलेतरी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष कायम असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर