दंत रुग्णालय झाले ४७ वर्षांचे

By Admin | Updated: July 13, 2015 02:31 IST2015-07-13T02:31:20+5:302015-07-13T02:31:20+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला सोमवारी ४७ वर्षे पूर्ण होत आहे. २०१७-१८ मध्ये सुवर्ण जयंती आयोजित केली आहे.

The dental hospital was 47 years old | दंत रुग्णालय झाले ४७ वर्षांचे

दंत रुग्णालय झाले ४७ वर्षांचे

अतिविशेषोपचार केंद्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला सोमवारी ४७ वर्षे पूर्ण होत आहे. २०१७-१८ मध्ये सुवर्ण जयंती आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने या संस्थेत मुखपूर्व कर्करोग याकरिता ‘अतिविशेषोपचार केंद्राची स्थापना’ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
दंत महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९६८ मध्ये झाली. रुग्णालयात मुखरोग निदान व क्ष किरणशास्त्र, दंतविकृतीशास्त्र, मुखशल्यशास्त्र हे तिन्ही विभाग अद्ययावत आहे. या विभागातून रुग्णाला उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. विशेषत: मुखपूर्व कर्करोगाचे निदान केले जात आहे. या करिता रुग्णालय प्रशासनाने अतिविशेषोपचार केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव तयार केला. नुकत्याच झालेल्या अभ्यागत मंडळात हा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना सादर केला असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.
दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी सांगितले, दंत महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणे आणि साधनसामुग्रीद्वारे उपचार केले जातात. अतिविशेषोपचार केंद्रासाठी रुग्णालयाला ८००० चौ.फूट जागेची आवश्यकता आहे. श्रेणीवर्धनासाठी १० कोटीच्या निधीची गरज आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या दंत रुग्णालयाला या केंद्रासाठी मंजुरी मिळाली आहे. त्याच धर्तीवर जागेचा व निधीचा प्रश्न सुटल्यास रुग्णाना अद्ययावत सोयी उपलब्ध होऊ शकतील. (प्रतिनिधी)
अतिदुर्गम भागातही रुग्णसेवा
महाविद्यालयातर्फे सामजिक दंतशास्त्राच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम म्हणून अतिदुर्गम भागात दंतशिबिरांमधून रुग्णसेवा दिली जात आहे. या शिवाय गुटखा व तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या रोगांबाबत संशोधन तसेच वैद्यकीय पुरावे वेळोवेळी शासनाला उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Web Title: The dental hospital was 47 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.