शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरमध्ये प्रवेश नाकारला; दोन गटांत टोळीयुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:36 IST

गुंड्यांकडून माऊझरने दहशत : गोकुळपेठेत खळबळ

नागपूर : हुक्का पार्लरमध्ये प्रवेश नाकारण्यावरून धरमपेठेत दोन गटांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. कुख्यात गुन्हेगार सागर यादव याने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना शिवीगाळ करत माऊझरची भीती दाखवत धमकी दिल्याने गोकुळ पेठेत तणावाचे वातावरण पसरले होते. ही घटना रविवारी रात्री घडली. अंबाझरी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून कुख्यात प्रीतम यादवसह सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

धरमपेठेतील गोकुळ पेठेत शोशा हुक्का पार्लर आहे. रविवारी साडेबारा वाजता सीताबर्डीतील सलमान सुफी त्याच्या सात-आठ साथीदारांसह शोशा हुक्का पार्लरमध्ये पोहोचला. हे हुक्का पार्लर प्रीतम यादव याचे आहे. हुक्का पार्लरमध्ये झालेल्या भांडणामुळे प्रीतम नेहमीच चर्चेत असते. हुक्का पार्लरचा दरवाजा बंद असल्याने सुफीने सुरक्षारक्षकाला पार्लरमध्ये प्रवेश देण्यास सांगितले. गर्दीचे कारण देत सुरक्षारक्षकाने सुफी आणि त्याच्या साथीदारांना प्रवेश देण्यास नकार दिला. सुफी आणि त्याच्या साथीदारांनी हुक्का पार्लरसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रीतम त्याच्या साथीदारांसह तेथे पोहोचला. त्याचा सुफी आणि त्याच्या साथीदारांशी वाद झाला. अचानक दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण सुरू केली.

दोन्ही गटांतील गुन्हेगारांनी काढला पळ

दरम्यान, शांतीनगरचा कुख्यात गुन्हेगार सागर यादव याने प्रतिस्पर्धी तरुणांवर माऊझर रोखत धमकी दिली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस येण्याच्या भीतीने दोन्ही गटातील गुन्हेगार तेथून पळून गेले. काही वेळाने पुन्हा काही तरुण तेथे जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सोमवारी या प्रकारचा व्हिडीओ समोर आल्यानंतर उपायुक्त राहुल मदने यांनी अंबाझरी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

अंबाझरी पोलिसांनी प्रीतम यादवसह सहा आरोपींना ताब्यात घेतले. सुफी हा शेखू टोळीचा सदस्य आहे. पश्चिम नागपुरातील हुक्का पार्लर टोळीयुद्ध आणि मारामारीमुळे चर्चेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी दोन महिन्यांपूर्वी सोनेगाव येथे मेट्रोच्या मालमत्तेचेही नुकसान केले होते. याप्रकरणी प्रीतम यादवसह सहा आरोपींना सोनेगाव पोलिसांनी अटक केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर