शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कोरोनानंतर आता डेंग्यूची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना आटोक्यात येत असताना, आता डेंग्यूची दहशत निर्माण झाली आहे. मागील २९ दिवसांत ३६ रुग्णांची नोंद ...

नागपूर : कोरोना आटोक्यात येत असताना, आता डेंग्यूची दहशत निर्माण झाली आहे. मागील २९ दिवसांत ३६ रुग्णांची नोंद झाली. जानेवारी ते आतापर्यंत ५० रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यूची अद्याप नोंद नाही, परंतु काळजी घेण्याचे व पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष देण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

नागपुरात २०१४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांत अचानक वाढ झाली. ६०१ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. कमी मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्रीचा अभाव यामुळे डेंग्यू नियंत्रणात येत नव्हता. यातच डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना नागरिकांचा सहभाग अल्प होता. परिणामी, २०१५ मध्ये २३० रुग्ण, २०१६ मध्ये १९५ रुग्ण व एक मृत्यू, २०१७ मध्ये १९९ रुग्ण, २०१८ मध्ये ५६५ रुग्ण, २०१९ मध्ये ६२७ रुग्ण व एक मृत्यू, २०२० मध्ये १०७ रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना, डेंग्यू रुग्णांची संख्या मे महिन्यापर्यंत १२ वर स्थिरावली होती, परंतु निर्बंध शिथील होताच व पावसाचा आगमनामुळे पुन्हा डेंग्यूचा रुग्णांत वाढ झाली. तज्ज्ञानुसार, वातावरणातील उकाड्यामुळे अनेकांच्या घरातील कूलर सुरू आहेत. परिणामी, ते डासांच्या उत्पत्तीचे केंद्र ठरले आहे. कूलरमध्ये केरोसिन, डेटॉल टाकण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

-ही आहेत लक्षणे

डेंग्यूमध्ये एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे व त्वचेवर व्रण उठणे आदी लक्षणे दिसून येतात.

-अशी घ्या काळजी

डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी कूलर, फुलदाणी, रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा, तरच डेंग्यू डासांची चिकटलेली अंडी निघतात. घरांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी. शौचालयाचे गॅस पाइप बारीक जाळीच्या कपड्याने झाकून ठेवावे. छतावरील पाण्याची टाकी झाकून ठेवावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. विहिरीत किंवा पाण्याचा टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व संपूर्ण अंग झाकेल, अशा कपड्यांचा वापर करावा.

-सहा वर्षांतील डेंग्यूची स्थिती

वर्ष : रुग्ण : मृत्यू

२०१५ :२३० :००

२०१६ :१९५ :०१

२०१७ :१९९ :००

२०१८:५६५ :००

२०१९:६२७ :०१

२०२० :१०७ :००

२०२१ : ५० :००

(२९ जूनपर्यंत)