चार हजारावर घरात डेंग्यू डासांच्या अळ्या

By Admin | Updated: September 12, 2014 00:52 IST2014-09-12T00:52:36+5:302014-09-12T00:52:36+5:30

डेंग्यूच्या रोगाने नागपूरकर बेजार झाले असून, आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे चित्र आहे.

Dengue larvae in four thousand mangoes | चार हजारावर घरात डेंग्यू डासांच्या अळ्या

चार हजारावर घरात डेंग्यू डासांच्या अळ्या

नागपूरकर त्रस्त : हनुमाननगर झोनमध्ये जास्त डास
नागपूर : डेंग्यूच्या रोगाने नागपूरकर बेजार झाले असून, आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या हिवताप व हत्तीपायरोग विभागाने आॅगस्ट महिन्यात १ लाख ५५ हजार ७२७ घरांची झाडाझडती घेतली यात तब्बल ४ हजार ६९८ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूचा ‘एडीस इजिप्त‘ नावाचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. यामुळे लवकरच यावर उपाययोजना न झाल्यास शहरात याचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात अहे.
शहरात डेंग्यू, मलेरिया व टायफाईड या आजारांची साथ पसरली आहे. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्यामुळे त्याची पैदास झपाट्याने होऊन रुग्ण संख्या वाढत आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी हिवताप व हत्तीरोगाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. या विभागाच्यावतीने मागील महिन्यात १लाख ५५ हजार ७२७ घरांची झाडाझडती घेण्यात आली. यात झोपडपट्टी परिसरासोबतच पॉश वसाहतीतील घरे डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनल्याचे दिसून आले. यातील ४ हजार ६९८ घरांंमधील कुलर्स, घरांच्या टीनावर टाकलेली टायर आणि उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. यात मनपाच्या हनुमाननगर झोनमधील सर्वात जास्त १७२२ घरे या डासांच्या उत्त्पत्तीचे केंद्र असल्याचे तपासणीत समोर आले. विभागाच्यावतीने या झोनमधील २१ हजारावर घराची झडती घेण्यात आली होती. या झोनच्या खालोखाल लकडगंज झोनमध्ये १६ हजार ४६७ घरांची झडती केली असता ६८४ घरांत, सतरंजीपुरा झोनमध्ये १३ हजार ९८७ घरांची झडती घेतली असता ४२६ घरांमध्ये तर गांधीबाग झोनमधील २१ हजार घरांची झडती घेतली असता ३४६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्या. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्व घरांमध्ये कीटनाशकांची फवारणी करून एक आठवड्याच्यावर पाणी साठवले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Dengue larvae in four thousand mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.