शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:48 AM

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने खासगी इस्पितळांतील डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्याही मोठी आहे.उपराजधानीत गेल्या सात वर्षांत मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. २०१८ मध्ये ५४३ वर रुग्ण तर जानेवारी ते आतापर्यंत ५० वर रुग्णाची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामे करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडत असल्याने काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु यात प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस जरी पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. तूर्तास तरी शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असलीतरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णासोबतच ’व्हायरल’रुग्ण वाढल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू