विमा कर्मचारी व अधिकाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST2021-02-20T04:19:50+5:302021-02-20T04:19:50+5:30
नागपूर : भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी विभागीय मंडल कार्यालयासमोर निदर्शने केली. मागील ...

विमा कर्मचारी व अधिकाऱ्यांची निदर्शने
नागपूर : भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी विभागीय मंडल कार्यालयासमोर निदर्शने केली. मागील ४१ महिन्यापासुन रखडलेले वेतन पुनर्निर्धारण, थेट परकीय गुंतवणुकीची सीमा ४९ टक्क्याहून ७४ टक्क्यावर वाढविणे व ‘एलआयसी’चे आयपीओ आणण्याच्या केंद्र सरकारचा विरोध म्हणून ही निदर्शने करण्यात आली.
२१ डिसेंबर २०२० ला संघटनांची व्यवस्थापनासोबत चर्चा झाली. त्यात १६ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. सर्व संघटनांनी तो नाकारला होता व नवीन प्रस्ताव व्यवस्थापनाने द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी व्यवस्थापनाकडुन काहीच हालचाल झालेली नाही. व्यवस्थापनाने जर वेतनवाढीवर लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ‘एनओआयडब्ल्यू’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल देशपांडे यांनी दिला. यावेळी ‘नोईनो’ संघटनेचे देवेंद्र वरखेडकर यांचेही भाषण झाले. सुभाष पांडे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र शहारे यांनी आभार मानले. यावेळी राकेश भूगावकर, उत्तम बोकडे, प्रसन्न वाघमारे, मनोज जोशी, चक्रदेव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.