पारशिवनीत उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:59+5:302021-07-07T04:09:59+5:30
करंभाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये तीन उमेदवार कुणबी समाजाचे आहेत. या सर्कलमध्ये इतर समाजदेखील आहे. मात्र कुणबी समाजाच्या मताच्या विभागणीवर ...

पारशिवनीत उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
करंभाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये तीन उमेदवार कुणबी समाजाचे आहेत. या सर्कलमध्ये इतर समाजदेखील आहे. मात्र कुणबी समाजाच्या मताच्या विभागणीवर विजय अवलंबून आहे. तसेच इतर समाजाची मते कोण जास्त खेचून आणतो हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नयाकुंड पंचायत समिती गणासाठी शिवसेनेच्या वतीने सुनीता नानाजी तायवाडे, भाजपाच्या वतीने आशा रवींद्र चौधरी तर काँग्रेसच्या वतीने गतवेळच्या उमेदवार मंगला उमराव निंबोने यांनी अर्ज दाखल केला.
चारगाव पंचायत समिती गणासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात शिवसेनेच्या वतीने गतवेळचे उमेदवार किसन सीताराम घंगारे, काँग्रेसच्या वतीने तुलसी प्रदीप दियेवार, भाजपच्या वतीने शिशुपाल वामन बेदरे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चंद्रशेखर शामराव राऊत, विठ्ठल बापूराव पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.