शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नोटाबंदी, जीएसटी हा तुघलकी निर्णय : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 21:01 IST

विद्यमान सरकारने नोटाबंदी व जीएसटीबाबत घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळाचे किंवा भाजपाचे नाहीत. तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वासात न घेता घेतले आहेत. हे निर्णय काळे धन आड मार्गाने पांढरे करण्याचा तुघलकी निर्णय आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. काटोल येथे काटोल फेस्टीवहलचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत आयोजित ‘युवा संसद’मध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देकाटोल फेस्टीव्हलमधील युवा संसद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यमान सरकारने नोटाबंदी व जीएसटीबाबत घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळाचे किंवा भाजपाचे नाहीत. तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वासात न घेता घेतले आहेत. हे निर्णय काळे धन आड मार्गाने पांढरे करण्याचा तुघलकी निर्णय आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.काटोल येथे काटोल फेस्टीवहलचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत आयोजित ‘युवा संसद’मध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमं आदमी पार्टीचे नेते खा. संजय सिंग, प्रवक्ता कीर्ती शर्मा मेमन, आ. डॉ. आशिष देशमुख, विनोद सहाय, अभिजित गुप्ता, प्रा. जवाहर चरडे, दिनकर राऊत, युवराज चालखोर, मारोतराव बोरकर, विजय महाजन, सोपान हजारे उपस्थित होते.खा. संजयसिंग यांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करीत सरकार देशातील बंधुभाव संपविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. छोटी राज्ये विकासाच्या दृष्टीने सोयीची असल्याचे सांगून त्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थन केले. आशीष देशमुख यांनी रामदेवबाबांनी काटोल येथे उद्योग उभारण्याचे आश्वासन देऊन साधे शेडही उभारले नाही, असा आरोप केला. मात्र, पक्षाचे सदस्यत्व अथवा आमदार पदाच्या राजीनाम्याबाबत ते काहीही बोलले नाही. प्रास्ताविक विद्याराज कोरे यांनी केले तर संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी केले. उत्कर्ष पवार यांनी आभार मानले.राजीनामा न देण्याचा सल्ला शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, माझ्याबाबत विविध कंड्या पिकविल्या जात आहे. पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप केला जात आहे. मी सर्वाधिक मताधिक्क्याने विजय संपादन केला असला तरी मला उमेदवारी न देण्याची धमकी दिली जात आहे. या सरकारने खरे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून गेतले आहे. पक्ष अथवा आमदार पदाचा राजीनामा देऊ नका, पक्षाने बडतर्फ केले तर करू द्या. पण, जनतेची कामे करणे सोडू नका असा सल्लाही सिन्हा यांनी देशमुखांना दिला.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाDemonetisationनिश्चलनीकरण