शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:35 IST

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी त्यांनी सप्टेंबर २०१५ पासून शासन व प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार चालविला आहे. त्यांच्या मागणीच्या २५ महिन्यानंतर प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना पत्र देऊन याबाबत तपशील मागविला आहे.भूषण दडवे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दडवे यांनी हेगडेवार स्मृती मंदिराला पर्यटन किंवा तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीबाबतची माहिती १८ सप्टेंबर २०१५ला माहितीच्या अधिकारात मागितली होती. यावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाने अशी मागणी कुणीही न केल्याचे उत्तर त्यांना दिले. त्यानंतर १२ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी दोन्ही कार्यालय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सरसंघचालक मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार व खासदारांना लेखी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यटन विभागाद्वारे दखल न घेतली गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान ३० जानेवारी २०१६ ला विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पुढील कारवाईस्तव लेखी आदेश दिला होता.मात्र याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दडवे यांनी पुन्हा ६ फेब्रुवारी २०१८ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, पालकमंत्री, पर्यटनमंत्री यांना निवेदन सादर केले.यावर १७ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना हेडगेवार स्मारकाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भूषण दडवे यांनी दिली. ही माहिती, माहितीच्या अधिकारात मिळाल्याचे त्यांनी सांगितले.देशविदेशातून हजारो नागरिक तसेच संघाचे, भाजपाचे नेते व कार्यकर्ते दर्शनासाठी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात येत असतात. दरवर्षी विजयादशमीच्या कार्यक्रमादरम्यान लाखो लोक येथे येतात. या परिसरात वर्षभर अनेक सामाजिक शिबिरे, संघ शिक्षा वर्ग तसेच आमदार व मंत्र्यांची कार्यशाळा येथे होते. त्यामुळे या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा ही आमची मागणी आहे, असे दडवे यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ