शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांच्या खंडणीची मागणी : नागपुरातील बजाजनगरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:21 IST

एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देतरुणाला मारहाण, तलवारीचाही धाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.राजा जमशेद शरीफ (वय २८) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो अनंतनगरातील अहबाब कॉलनीत (गिट्टीखदान) राहतो. त्याने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, २६ एप्रिलला दुपारी १ वाजता आरोपी आशिष सोनोने आणि तपन जयस्वाल या दोघांनी बजाजनगर बास्केटबॉलच्या ग्राऊंडजवळ बोलविले. तेथे सोनोने आणि जयस्वालने राजाला पाच लाख आणले का, असे विचारले. कशाचे पाच लाख, असा राजाने प्रश्न केला असता मागे उभा असलेल्या एका आरोपीने त्याला मानेवर थापड मारली तर, दुसऱ्या एका आरोपीने कंबरेत जोरदार लाथ मारली. आरोपी सोनोने तलवार आणतो, असे म्हणत त्याच्या लाल रंगाच्या कारजवळ धावत गेला. तुझे तुकडे तुकडे करतो, अशी धमकीही दिली. प्रसंगावधान राखत राजा पळून गेला. दरम्यान, त्याने बऱ्याच विलंबाने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी सोनोने, जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.क्रिकेट सट्ट्याची रक्कम?आरोपी तपन जयस्वाल हा मद्यविक्रेता असून, तो क्रिकेट सट्ट्याच्या बेटिंगमध्येही सक्रिय असल्याचे पोलीस सांगतात. त्याचे कुख्यात बुकी राजसोबत घनिष्ठ संबंध आहे. राजा नेमका काय करतो, याची माहिती पोलिसांकडे नाही. मात्र, सोनोने आणि जयस्वालमुळे ही रक्कम क्रिकेट सट्ट्यातील उधारीची असावी, असा पोलिसांचा संशय आहे. आयपीएलदरम्यान बुकी आणि सटोड्यांमध्ये क्रिकेट सट्ट्याच्या लगवाडी-खायवाडीच्या रकमेचा वाद दरवर्षीच उफाळून येतो. त्यातून अनेकांचे भांडण होतात. वसुलीसाठी अपहरण करण्याचे, धमकावण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. हा त्यातीलच प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय असून, राजचे काही कनेक्शन आहे का, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर