खंडणीची मागणी; गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 24, 2015 02:15 IST2015-04-24T02:15:13+5:302015-04-24T02:15:13+5:30
किराणा व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्या दुकानातील साहित्य फेकून मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खंडणीची मागणी; गुन्हा दाखल
नागपूर : किराणा व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्या दुकानातील साहित्य फेकून मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मो. रियाज मो. नपूसा (४९) व मो. अफरोज मो. छोटू (२५) रा. दोन्ही बोरियापुरा अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी सायं. ५.३० चे सुमारास आरोपींनी फिर्यादी राजकुमार रमेश गिडलानी यांच्या मोमीनपुऱ्यातील दुकानात जाऊन ५ हजार रुपयांची मागणी केली व तेथील साहित्य बाहेर फेकले व मारहाण केली. गिडलानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
सरकारी कामात अडथळा
वाडी नगर पालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. बुधवारी दुपारी ३.३० चे सुमारास दत्तावाडीतील जि.प. मुलींच्या शाळेत ही घटना घडली. संजय भोंगाडे व मनिषा संजय भोंगाडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी फिर्यादी धनश्री माणिकराव कुटेमाटे (२७) या मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली व मारहाण केली. या प्रकरणी कुटेमाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संजय भोंगाडेला अटक करण्यात आली आहे.
प्रतापनगरात घरफोडी
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला येथे राहणारे वासुदेव मधुकर मोहोड (वय ३५) हे लग्नाला बालाघाट येथे गेले असता सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ५१,१०० रुपचांचा ऐवज पळविला.याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)