खाऊ गल्लीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST2020-12-22T04:08:25+5:302020-12-22T04:08:25+5:30

नागपूर : खाऊ गल्लीत अनेक प्रकारच्या असुविधा असून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागपूर शहर युवक कॉंग्रेसच्या ...

Demand for provision of facilities in Khau galli () | खाऊ गल्लीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ()

खाऊ गल्लीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ()

नागपूर : खाऊ गल्लीत अनेक प्रकारच्या असुविधा असून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागपूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने खाऊ गल्ली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी खाऊ गल्लीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, बेरोजगार दुकानदारांना न्याय द्यावा, परिसराची दुरुस्ती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी युवक कॉंग्रेसचे सचिव, नगरसेवक बंटी बाबा शेळके, शहर अध्यक्ष तौसिफ खान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव सागर चव्हाण , शहर महासचिव नयन तरवटकर, मध्य नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल ढोके, प्रदेश सचिव वसीम शेख, अ‍ॅड अभय रणदिवे, हेमंत कातुरे, अतुल मेश्राम, शोएब खान, कुणाल खडगी, शोएब अंसारी, आयुष राऊत, प्रणय शिंदे, मुकुल दशमुख, रोहन कुलकर्णी, सार्थक चिचमलकर, आदित्य वैद्य, पराग तरार, अमोल पाटिल, माधव जुगल, शुभम खोते, शिशिर सावळेस मुबाशिर अहमद, इमरान खान, फरदीन खान, शुभम जगताप, साहिल थोटे, वृषभ हजारे उपस्थित होते.

...............

Web Title: Demand for provision of facilities in Khau galli ()