हिरणवार ले-आऊटमध्ये मिळाल्या डिमांड नोट

By Admin | Updated: August 29, 2014 00:59 IST2014-08-29T00:59:11+5:302014-08-29T00:59:11+5:30

दक्षिण-पश्चिम नागपुरातील जयताळा परिसरातील कार्गो प्रकल्पाच्या आरक्षणामुळे व यूएलसीच्या आरक्षणामुळे नियमितीकरणापासून वंचित असलेल्या हिरणवार ले-आऊट येथील नागरिकांना

Demand note received in the Learn-out layout | हिरणवार ले-आऊटमध्ये मिळाल्या डिमांड नोट

हिरणवार ले-आऊटमध्ये मिळाल्या डिमांड नोट

नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील जयताळा परिसरातील कार्गो प्रकल्पाच्या आरक्षणामुळे व यूएलसीच्या आरक्षणामुळे नियमितीकरणापासून वंचित असलेल्या हिरणवार ले-आऊट येथील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आ. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील नागरिकांना डिमांड नोट वितरित करण्यात आल्या.
जयताळा परिसरातील हिरणवार ले-आऊट हा भाग मिहानच्या आरक्षणामध्ये होता. यूएलसीचेही आरक्षण होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सोयीसुविधांसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. या भूखंडाचे नियमितीकरणासंदर्भात अनिश्चिततेचे वातावरण होते. बहुतांश भूखंडांवर घरे बांधण्यात आलेली आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आ.देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत हा भाग मिहानच्या तसेच यूएलसीच्या आरक्षणातून वगळून घेतला.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे या ले-आऊटला गुंठेवारी कायद्यांतर्गत मंजुरी दिली व त्याच्या डिमांड नोटही वितरित करण्यात आल्या आहेत. यामुळे हिरणवार ले-आऊटमधील १५२ रहिवाशांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे .
हिरणवार ले-आऊटमधील हनुमान मंदिराच्या वॉल कम्पाऊंडचे बांधकाम आ. फडणवीस यांच्या स्थानिक विकास निधीतून होणार असून, त्याही कामाचे भूमिपूजन तसेच झाडे ले-आऊटमधील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. डिमांड नोट वाटपाच्या कार्यक्र माला आ. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दक्षिण-पश्चिम भाजप मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, किशोर वानखेडे, नितीन तेलगोटे, दिलीप दिवे, नेहारे, सुधाकरराव मडके, अशोक ठाकरे, महेंद्र भार्गव, लहू बेहते, भीमराव भागानगरे, विजय जामगडे, राहुल दुरबुले, राम कडू, रवी शेंडे, घोडे, सुरेश राऊत, अनुसूयाताई भोगे, विवेक बापट, चंद्रशेखर मेश्राम, सचिन शेंडे, मयूर गोमासे, सौरभ भार्गव, प्रफुल भोगे, प्रवीण सावरकर, महेंद्र ठाकरे, प्रफुल पंचभाई, सतीश मोरे, अजय कटरे, भुवनेश्वर शेंडे, मोरेश्वर झिले, रमेश हटवार, सुधाकर चरपे, मुकुंद घुगरे, दत्ता भुसारी, प्रशांत आकांत, प्रभाकर वानखेडे, दिलीप झोपे, सुभाष ठाकरे, विष्णू डहाके, संजय धोटे, प्रेम भानखेडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demand note received in the Learn-out layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.