मृताच्या कुटुंबीयांना मोबदला देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:10+5:302021-02-24T04:09:10+5:30

नागपूर : बुटीबोरी एमआयडीसीस्थित एका कंपनीत काम करताना झालेल्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या २२ वर्षीय मजुराच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यात यावा ...

Demand for compensation to the family of the deceased | मृताच्या कुटुंबीयांना मोबदला देण्याची मागणी

मृताच्या कुटुंबीयांना मोबदला देण्याची मागणी

नागपूर : बुटीबोरी एमआयडीसीस्थित एका कंपनीत काम करताना झालेल्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या २२ वर्षीय मजुराच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यात यावा व मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख यशवंत रहांगडाले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बुटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार करीत मागणी केली आहे. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष यजेंद्रसिंह ठाकूर, संजय राऊत, सुरेश बिसेन, महेश पटले, इम्तियाज अली यांच्यासह मृताचे कुटुंबीय उपस्थित होते.

०००

गृहिणी समाजाचा पुरस्कार वितरण समारंभ

(फोटो समाचारमधून घ्यावा)

नागपूर : गृहिणी समाज रामदासपेठद्वारे ‘ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा फायदा व नुकसान तसेच आत्मनिर्भर भारत’ या विषयावर महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रामुख्याने गृहिणी समाज रामदासपेठच्या अध्यक्ष माला सुकळीकर, सचिव वंदना मुजुमदार, सहसचिव संध्या रानडे, सभासद मीरा खडक्कार, छाया गोडे, हेमा देशपांडे, स्वाती कुळकणी आदी उपस्थित होत्या. यावेळी सुमतीताई सुकळीकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली व्यक्त करण्यात आली.

Web Title: Demand for compensation to the family of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.