शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळांवर नियंत्रणासाठी लवाद स्थापण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:21 IST

सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था संचालकांकडून अनेक प्रकारच्या प्रताडना सहन कराव्या लागतात. असे असूनही त्यांची सुनावणी कुठे होत नाही. ही अडचण लक्षात घेता या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘स्कूल ट्रिब्युनल’ (लवाद)ची स्थापना करण्यात यावी

ठळक मुद्देसीस्वातर्फे १ जानेवारीला जनआंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था संचालकांकडून अनेक प्रकारच्या प्रताडना सहन कराव्या लागतात. असे असूनही त्यांची सुनावणी कुठे होत नाही. ही अडचण लक्षात घेता या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘स्कूल ट्रिब्युनल’ (लवाद)ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सीबीएसई स्कूल्स स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सीस्वा) या संघटनेने केली आहे.सीबीएसई शाळांमध्ये कायमस्वरूपी, तात्पुरते किंवा रोजंदारीवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी संविधान चौक येथे जनआंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. सीबीएसई शाळांमध्ये कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन न देणे, कधीही काढणे, युनियनचे सदस्य न होण्यासाठी धमकविण्याचे प्रकार होत आहेत. एवढेच नाही तर अनेक शाळांमध्ये स्त्रियांना प्रसूती रजेपासून वंचित ठेवले जाते. या तक्रारी ऐकून घेण्यासाठी लवाद स्थापन करणे आवश्यक असल्याचे डबली म्हणाल्या. याशिवाय आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांना निश्चित नियुक्तीपत्र देणे, योग्य वेतन रचना, सातव्या वेतन आयोगानुसार पगार, कालबद्ध पदोन्नती, विविध सुट्यांची अंमलबजावणी, कामाच्या योग्य वेळा, विद्यार्थ्यांसाठी नियमित व योग्य शुल्क वेळापत्रक, शाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण सुविधा व सवलती आदी मागण्यांकडेही लक्ष वेधले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत सचिव आंचल देवगडे, महेश डबली, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रमोद रेवतकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर