कोल्हापुर-धनबाद एक्स्प्रेसमध्ये प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST2021-06-21T04:06:48+5:302021-06-21T04:06:48+5:30

नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डॉक्टरांनी तपासून या महिलेस मेयो ...

Delivery in Kolhapur-Dhanbad Express | कोल्हापुर-धनबाद एक्स्प्रेसमध्ये प्रसुती

कोल्हापुर-धनबाद एक्स्प्रेसमध्ये प्रसुती

नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डॉक्टरांनी तपासून या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली असून माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

मधु रावत ही महिला आपले पती राम सुंदर रावत यांच्या सोबत रेल्वेगाडी क्रमांक ०१०४५ कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत होती. नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या महिलेस प्रसुती वेदना सुरु झाल्या. गाडीतील टीटीईने याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. उपस्टेशन व्यवस्थापक डी. के. सिंग यांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. ही गाडी प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच स्ट्रेचरवरून महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेचे डॉ. ऋषिकेश यांनी या महिलेची तपासणी केली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ आणि माता दोघेही सुखरूप असून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्यामुळे सर्व काही ठिक झाल्याची भावना महिला आणि तिच्या पतीने व्यक्त केली आहे.

...............

Web Title: Delivery in Kolhapur-Dhanbad Express