डिलिव्हरी बॉयची बॅग चोरट्याने पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST2021-07-25T04:07:45+5:302021-07-25T04:07:45+5:30

अजय वीरेंद्र महतो (२५) रा. प्लॉट नं. २९, विश्वशांतीनगर, खडवानी टाऊनजवळ असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो फ्लिपकार्ट ...

The delivery boy's bag was stolen | डिलिव्हरी बॉयची बॅग चोरट्याने पळविली

डिलिव्हरी बॉयची बॅग चोरट्याने पळविली

अजय वीरेंद्र महतो (२५) रा. प्लॉट नं. २९, विश्वशांतीनगर, खडवानी टाऊनजवळ असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो फ्लिपकार्ट कंपनीत काम करतो. रविवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता तो अ‍ॅपल आयफोनचे पार्सल घेऊन वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरली माधव अपार्टमेंट फ्लॅट नं. १०४ येथे राहणाऱ्या वैभव श्रीरामे यास देण्यास गेला होता. अजयने गाडी पार्क करून सामान असलेली बॅग गाडीवर ठेऊन आयफोन देण्यास गेला. परंतु फ्लॅटमध्ये वैभव श्रीरामे राहत नसल्याचे समजल्यानंतर तो खाली परत आला असता त्याला आपली बॅग गाडीवर दिसली नाही. बॅगमध्ये विविध कंपनीचे मोबाईल आणि इतर साहित्य असा ६३ हजार ८९२ रुपयांचा मुद्देमाल होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...............

Web Title: The delivery boy's bag was stolen