शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

दिल्लीच्या ठकबाजांची मोबाईलच्या माध्यमातून 'स्मार्ट लूट

By नरेश डोंगरे | Updated: August 5, 2025 20:19 IST

मैत्री करून केली चोरी, नंतर घातला गंडा : रेल्वे पोलिसांची चिकाटी, १४ महिन्यानंतर बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत मैत्री करून आधी त्याचा मोबाईल लंपास करायचा. नंतर, त्या मोबाईलचा गैरवापर करून सोने खरेदी करून लाखोंचा गंडा घालायचा, अशी कार्यपद्धती असेलल्या दिल्लीतील ठगबाजांच्या टोळीतील एका भामट्याच्या येथील रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एखाद्या सिरियल मधील वाटावी, अशी या भामट्याची ठगबाजीची स्मार्ट कार्यपद्धती असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

ग्वालियरच्या शताब्दीपूरम येथे राहणारे अनुजसिंग कुशवाह (वय ४२) हे ७ मे २०२४ रोजी नागपूर ते ग्वालियर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर उभे होते. कॉलेजियन वाटणाऱ्या दोन भामट्यांनी त्यांच्याशी सलगी साधली. नंतर गाडी फलाटावर आल्याचे पाहून स्वत:च्या फोनची बॅटरी डाऊन झाल्याची थाप मारत कुशवाह यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि कुशवाह अन्य प्रवाशांच्या गर्दीत गाडीत शिरत असताना हे भामटे पसार झाले. गाडी सुटल्यानंतर कुशवाह यांनी कोचमध्ये त्यांची शोधाशोध केली मात्र ते काही आढळले नाही. कुशवाह यांच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये दोन एटीएम कार्ड आणि यूपीआय कोड होता. कार्डचा वापर करून या भामट्यांनी रक्कम काढली. नंतर नागपूरच्या एका सराफा दुकानात जाऊन ३ लाख, २५ हजारांचे सोने खरेदी केले. त्याचे यूपीआय पेमेंट कुशवाह यांच्या मोबाईलचा वापर करून केले. कुशवाह ग्वालियरला पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि सहकाऱ्यांनी आधी रेल्वे स्थानकावरचे आणि नंतर एटीएम तसेच सराफाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढले. त्यावरून आरोपींचा शोध सुरू होता. मात्र, १४ महिने होऊनही ते काही हात लागले नव्हते.  

१४ महिन्यानंतर पुन्हा नागपूरया घटनेच्या १४ महिन्यानंतर हे भामटे पुन्हा  ३० जुलै २०२५ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर आले आणि सावज शोधत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. कंट्रोल रूमच्या माध्यमातून ही माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी संशयीत आरोपी आझाद उर्फ नासीर हुसैन (वय ३२, रा. बवाना, दिल्ली) याला ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने 'बाजीराव'समोर शरणागती पत्करत चोरीची कबुली दिली. ठगबाजी करून विकत घेतलेले सोने दिल्लीतील एका सराफाला विकल्याचीही माहिती दिली. त्यानुसार, त्याच्यासोबत दिल्लीत जाऊन पोलिसांनी १२ ग्राम सोन्याची लगडी जप्त केली. 

आणखी दोन गुन्हे पोलिसांकडून प्रसाद मिळताच आरोपीने याआधीही अशा पद्धतीने नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोनि गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात पीएसआय दिलीप सुपले, नायक संजय पटले, हवलदार पुष्पराज मिश्रा, अमोल हिंगणे, अमित त्रिवेदी आणि राजेश पराते यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :nagpurनागपूर