शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित शहर ­­, मुंबई-काेलकाताही यादीत; फुफ्फुसासह मेंदू आणि हृदयावरही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 05:41 IST

रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये राहिल्याने नवी दिल्ली विषारी धुक्याने वेढली गेली आहे. स्वीत्झर्लंडच्या ‘आयक्यूएअर’च्या आकडेवारीनुसार कोलकाता, मुंबईसह भारताची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक ठरली.रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवरच नाही तर सर्व वयोगटातील लोकांच्या हृदय आणि मेंदूसारख्या इतर प्रमुख अवयवांवर देखील परिणाम होतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

नागरिकांना काय होतोय त्रास?कमी तापमान आणि शेजारील राज्यांमध्ये शेतीचा काडीकचरा जाळण्यामुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. नवी दिल्लीच्या २ कोटी रहिवाशांपैकी अनेकांनी डोळ्यात जळजळ होण्याची आणि घशात खाज येण्याची तक्रार केली. 

वायू प्रदूषणाचा गर्भावर विपरित परिणाम...हवेची गुणवत्ता गंभीर राहिल्याने, तज्ज्ञांनी मोठ्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीचा इशारा देताना गर्भावर दुष्परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील एका हॉस्पिटलचे वरिष्ठ फुफ्फुस विशेषज्ञ डॉ. अरविंद कुमार यांच्या मते, वायू प्रदूषणावर ‘एअर प्युरिफायर’ हा उपाय नाही. जेव्हा गर्भवती महिला श्वास घेते तेव्हा विषारी वायू तिच्या फुफ्फुसात जातो; फुफ्फुसातून तो रक्तात जातो आणि प्लेसेंटाद्वारे गर्भापर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यावर वाईट परिणाम करताे.”

प्राथमिक शाळा  बंदच राहणारप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सहावी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

घरून काम करावायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारी आणि खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे, अशी सूचना दिली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण