‘दिल्ली गँग’ गवसली
By Admin | Updated: December 5, 2014 00:37 IST2014-12-05T00:37:48+5:302014-12-05T00:37:48+5:30
बंद विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना ठगवणाऱ्या आंतरराज्यीय दिल्ली गँगचे दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने

‘दिल्ली गँग’ गवसली
दोघांना अटक : विमा पॉलिसीच्या नावावर फसवणूक
नागपूर : बंद विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना ठगवणाऱ्या आंतरराज्यीय दिल्ली गँगचे दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने या गँगला पकडले आहे. राहुल शर्मा ऊर्फ रोहित सिंह रतन सिंह (२४) आणि विजय देसाई ऊर्फ राजू चंदेश्वर पंडित (२३) अशी आरोपीची नावे आहेत.
अजनी येथील एका महिलेने एसबीआय लाईफ विमा पॉलिसी काढली होती. काही महिने पैसे भरल्यानंतर ती पॉलिसी बंद पडली. एका वर्षापूर्वी महिलेले मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला विमा सल्लागार असल्याचे सांगितले आणि एसबीआयच्या बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे परत करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी ७ लाख ८० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर फोन येणे बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. जुलै महिन्यात महिलेने अजनी पोलीस ठाण्यातच तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी दुय्यम निरीक्षक एस.व्ही. पवार यांच्यावर सोपविण्यात आली होती. पवार यांनी इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सच्या मदतीने आरोपींना शोधून काढले. पवार यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली पोलिसांच्या मदतीने आपल्या सहकाऱ्यांसोबत आरोपीला पकडले. (प्रतिनिधी)