एलबीटी हटविणार;व्यापार वाचविणार

By Admin | Updated: October 10, 2014 00:56 IST2014-10-10T00:56:08+5:302014-10-10T00:56:08+5:30

महाराष्ट्र सरकारने एलबीटी आणून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील व्यापार चौपट केला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेचे बजेटही सरकारने बिघडविले आहे. त्यामुळे शहराचे विकासकार्य

Deleting LBT; save business; | एलबीटी हटविणार;व्यापार वाचविणार

एलबीटी हटविणार;व्यापार वाचविणार

भाजपाचा दावा : कळमन्यात प्रचारयात्रा
नागपूर : महाराष्ट्र सरकारने एलबीटी आणून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील व्यापार चौपट केला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेचे बजेटही सरकारने बिघडविले आहे. त्यामुळे शहराचे विकासकार्य प्रभावित झाले आहे. काँग्रेस सरकारने एलबीटीच्या मुद्यावरून व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला आहे. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन भाजपाचे पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी दिले.
खोपडे यांनी कळमना मार्केट परिसरात प्रचार रॅली काढून भाजीबाजार, धान्यबाजार, फळ बाजार, मिरची बाजार व व्यापारी संघटनाशी संपर्क साधला. व्यापाऱ्यांनी त्यांना एलबीटीमुळे व्यापाऱ्यांच्या अवस्थेची जाणीव करून दिली. एलबीटी रद्द करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. प्रचार रॅलीत खोपडे यांच्यासोबत प्रदीप पोहाणे, मेघराज मैनानी, आसिफभाई कलीवाला, संजय वाधवानी, अतुल सेनाड, सारंग वानखेडे, गोपाल कळमकर, प्रताप मोटवानी, रामअवतार अग्रवाल, महेंद्र कटारिया, भूपेंद्र चेलानी, अशोक शनिवारे, रमेश भावळकर, विनोद गर्ग, कन्हय्यालाल चावला, वसंत पटले, नाना बांगडे, सुरेश नागदेव, रितेश पुरोहित, राजा मैनानी, पन्नालाल शाहू, भूषण क्षीरसागर, उदय आकरे, सुरेश बारई, बबलुभाई, भगतराम रावलदास, तसलीमभाई फ्रुटवाले, श्याम बजाज, सुनील सातव, सतीश पवार, सचिन पुनयानी, संदेश कनोजे, राजेश मुनीयार, रवी अग्रवाल, राजू कटारिया, रामदास गजापूरे, संदीप तेलमासरे, बंटी बोलधन आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Deleting LBT; save business;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.