उमरेड येथे कोरोना चाचणीला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST2021-04-08T04:09:33+5:302021-04-08T04:09:33+5:30
उमरेड : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले तसेच कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणीसाठी बुधवारी उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात बोलाविण्यात आले ...

उमरेड येथे कोरोना चाचणीला विलंब
उमरेड : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले तसेच कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणीसाठी बुधवारी उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात बोलाविण्यात आले होते. सकाळी ११ वाजतापासून नागरिक रांगेत लागणे सुरू झाले. बराच वेळ होऊनही चाचणी सुरू झाली नाही. दुपारी ३.३० वाजता चाचणी सुरू करण्यात आली. यावेळी सुमारे २०० नागरिकांची गर्दी होती. विलंबाने चाचणी सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कोरोना चाचणीसाठी बुधवारी ११ ते १२ वाजता बोलावल्या गेले होते. इकडे नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. तीन तास उलटून गेल्यानंतर नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर एकाही नागरिकाची चाचणी झाली नव्हती. यावरून काही नागरिकांनी विचारणा केली असता, आमच्याकडे कर्मचारी नाहीत, अशी बाब सांगितल्या गेली. यावरून नागरिक भडकले. अखेरीस दुपारी ३.३० वाजता अँटिजेन टेस्ट तसेच काही प्रमाणात आरटीपीसीआर टेस्ट सुरू झाली. सदर कोरोना चाचणीच्या समस्येकडे तहसीलदार प्रमोद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
-
उमरेड ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी नागरिकांची झालेली गर्दी.