शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

कॅगमधील कारवाईत विलंब झाल्यास खानापूर्तीला वाव : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:40 PM

कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतत्काळ कारवाई न झाल्यास जनतेत चुकीचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, कॅगने नगरविकास खात्यातील कामाशी संबंधित कामांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवला आहे. ६५ हजार कोटी रुपयांची ही रक्कम आहे. कामांच्या पूर्ततेचे प्रमाणपत्र न देण्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा प्रकरणात ऑडिटमध्ये चौकशीची प्रक्रिया आहे. तपास यंत्रणांकडून नोटिसा जातात. खरे तर गैरव्यवहाराला निमंत्रण देण्याची प्रक्रिया आहे. त्यात अवधी मिळाल्यास कागदपत्रे हुक करणे, जमाखर्चाची खोटी बिले सादर करणे, खोटा खर्च सादर करणे याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ कारवाई करण्याची गरज असते. असे झाले नाही तर प्रशासन किंवा विभागाची आपल्या यंत्रणेवर पकड नसल्याचा चुकीचा संदेश जनतेत जातो. त्यातूनच भ्रष्टाचार होतो, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.कॅगने ६५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याची प्रमाणपत्रे दिली नसल्याने आक्षेप घेतला आहे. त्याच कामासाठी खर्च केला की नाही, हे तपासण्याची ती प्रक्रिया असते. रक्कम मोठी असेल तर गैरव्यवहाराची शक्यता असते. कालांतराने यंत्रणेला जनतेला विसर पडतो. कागदांची खानापूर्ती होईलही, माहितीची जुळवाजुळव होईल, अधिकारी यातून बाहेर जातील; मात्र जनतेच्या हिताची कामे यातून खरेच झाली की नाही, हे सांगता येणार नाही.गुजरातमधील दंगली अधिकारातील लोकांकडूनचगुजरातच्या दंगलींना विसरून चालणार नाही. ते दगड मारतील तर विट मारू, ही आठवण यावेळी भाजपाचे मंत्री करीत असतील तर ही एक धमकीच आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, गुजरातमधील दंगे अधिकारात बसणाऱ्या लोकांकडूनच करण्यात आले होते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कर्नाटकातही आता दंगली वाढल्या आहेत. तिथे अधिकारात बसलेली मंडळी गुजतारसारखीच विशिष्ट धर्माच्या विरोधात बसलेली मंडळी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMediaमाध्यमे