शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:59 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला.‘गो एअर’चे विमान क्रमांक २६०२ नागपूर-मुंबईला जवळपास तीन तासांचा उशीर झाला. याची माहिती प्रवाशांना देण्यात आली तर ते संतप्त झाले. विलंबाचे कारणदेखील स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे नाराज प्रवाशांनी ‘एअरलाईन्स’च्या कर्मचाऱ्यांवर राग काढला. या विमानात नागपूरहून मुंबईला जाणारे १७४ प्रवासी होते.इंजिनमध्ये होती समस्यासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या इंजिनमध्ये काही तरी समस्या निर्माण झाली होती. तर विमानतळाच्या अधिकृत सूत्रांनुसार ‘ऑपरेशनल’ कारणांमुळे विमानाला विलंब झाला. मुंबईत धावपट्टीचे काम सुरू असल्याने विमानाला उशीर झाला असेदेखील काही जणांनी सांगितले. दरम्यान रात्री ८ वाजेनंतर विमान मुंबईकडे रवाना झाले.आठ विमानांना विलंबसोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या  व येथून उड्डाण भरणाºया एकूण आठ विमानांना विलंब झाला. इंडिगो एअरलाईन्सचे ६ई-२८४ पुणे-नागपूर रात्री १२.५५ ऐवजी २.३७ वाजता आले. तर ६ई-३१२ बेंगळुरू-नागपूर रात्री ८.४० ऐवजी रात्री ९.२० वाजता आले. ६ई-४०३ मुंबई-नागपूर विमान दुपारी चार ऐवजी ५.२५ वाजता ‘लॅन्ड’ झाले. तर ‘गो एअरलाईन्स’चे जी८-२५१९ दिल्ली-नागपूर विमान सायंकाळी ७.२० ऐवजी रात्री ८.४५ ला पोहोचले.तर जी८-८११ नागपूर-बंगळुरू विमान सकाळी ६ ऐवजी ९ वाजता रवाना झाले. ६ई-३१७ नागपूर-बंगळुरू विमान सकाळी १०.५० ऐवजी १२.०५ ला गेले. ६ई-५७१ नागपूर-चेन्नई विमान दुपारी १.३० ऐवजी दुपारी २.५८ ला रवाना झाले. तर ‘गो एअरलाईन्स’चे २५२० नागपूर-दिल्ली विमान रात्री ९.२५ ऐवजी रात्री १०.५० ला उडाले.

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर