नागपूरच्या डिफेन्स परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:44 IST2017-11-20T14:37:30+5:302017-11-20T14:44:20+5:30
मित्राचा फोन आल्यानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुध निर्माणीच्या (डिफेन्स) परिसरातील आटा चक्कीजवळ रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

नागपूरच्या डिफेन्स परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
आॅनलाईन लोकमत
वाडी : मित्राचा फोन आल्यानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुध निर्माणीच्या (डिफेन्स) परिसरातील आटा चक्कीजवळ रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
जितेंद्र हरिराम कालपांडे (३२, रा. सत्यसाई सोसायटी, वाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा रविवारी सायंकाळी आयुध निर्माणी परिसरातील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेला होता. तो रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भाजीपाला घेऊन घरी परतला. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या मित्राचा फोन आल्याने तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो रात्रभर घरी परत आला नाही, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान, सोमवारी सकाळी काही नागरिक या परिसरात फिरायला गेले असता, त्यांना आटा चक्कीजवळ मृतदेह पडला असल्याचे आढळून आले. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह जितेंद्र कालपांडे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा खून कुणी आणि कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.