जाचक ‘एलबीटी’ शासनाने हटवावा
By Admin | Updated: June 10, 2014 01:13 IST2014-06-10T01:13:55+5:302014-06-10T01:13:55+5:30
एलबीटीमुळे व्यापार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यापार्यांसाठी जाचक ठरलेला एलबीटी शासनाने हटवावा, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्यांनी राज्याचे

जाचक ‘एलबीटी’ शासनाने हटवावा
मुद्यांवर चर्चा : नागपूर चेंबर ऑफ कॉर्मसची मुख्य सचिवांकडे मागणी
नागपूर : एलबीटीमुळे व्यापार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यापार्यांसाठी जाचक ठरलेला एलबीटी शासनाने हटवावा, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्यांनी राज्याचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्याकडे नागपुरात केली.
एलबीटीवर चर्चा करताना हा कर दूर होण्याचे सूतोवाच सचिवांनी केले. चेंबरचे अध्यक्ष कैलास जोगानी यांनी सांगितले की, लवकरच येऊ घातलेला जीएसटी थ्री टायर न राहता टू टायर राहील आणि स्थानिक करांचा त्यात समावेश असेल. जीएसटी येईपर्यंंत एलबीटीऐवजी दुसर्या कराची आकारणी करू नये. राज्य सरकारने मनपाला केंद्राकडून मिळणारा राज्याचा वाटा आणि राज्याला मिळणार्या महसुलातून एलबीटीची भरपाई करावी.
मनपामध्ये कर प्रशासन आणि कलेक्शनचा अनुभव तसेच योग्य यंत्रणा नसल्याने व्यापारी आणि मनपाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ट्रेड आणि इंडस्ट्रीला एलबीटी नको, पण त्या बदलत्या सरकारने पुन्हा जकात आणू नये. व्यापार्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले. चेंबरच्या प्रतिनिधी मंडळात सचिव प्रदीप जाजू, माजी अध्यक्ष कमलेश शाह, महेंद्र कटारिया, उपाध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे आणि संचालक महेश गोयल उपस्थित होते. (प्रतिनिधी)