शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
2
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
3
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
4
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
5
Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य
6
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
7
'त्रिदेव' फेम अभिनेत्री सोनम खान तीन दशकानंतर करतेय कमबॅक, या कारणामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री
8
Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीत आधी घसरण, मग किरकोळ तेजी; एशियन पेट्स वधारला, PSU शेअर्समध्ये तेजी
9
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
10
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
11
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
12
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
13
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
14
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
15
मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र
16
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
17
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
18
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
19
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
20
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक

पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण, कुणाल राऊतला अटक

By योगेश पांडे | Published: February 05, 2024 12:03 AM

जिल्हा परिषदेतील बॅनर प्रकरण तापले : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्रुपीकरणाच्या कृतीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरचे विद्रुपीकरण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सदर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांना कुही येथून अटक करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या या कृतीचा निषेध केला आहे.

विकसित भारत संकल्पना यात्रेच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात ३० दिवसांअगोदर दोन बॅनर लावले होते. बॅनरवर वरच्या बाजूला ‘मोदी सरकारची हमी’ आणि खालच्या बाजूला ‘आपला संकल्प विकसित भारत’ असे नमूद केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोदेखील होता. शनिवारी सुटीचा दिवस असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कुणाल राऊत व ३० ते ४० अज्ञात इसम शासकीय इमारतीच्या परिसरात शिरले. त्यांनी दोन्ही बॅनर्सचे विद्रुपीकरण केले. ‘मोदी’ शब्दाऐवजी ‘भारत’ असे स्टीकर चिपकविले व त्यानंतर काळ्या पेंटने पंतप्रधानांच्या फोटोची विटंबना केली. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना कुहीतून रविवारी अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली.

आधी बजावली नोटीस, कुहीतून अटकरविवारी सकाळी राऊत यांना माहिती पत्र देऊन संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याचा दावा एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र सायंकाळी त्यांना कुहीतून अटक करण्यात आली. याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेसच्या जि. प. पदाधिकाऱ्यांकडून विद्रुपीकरणाचा निषेधजिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी या विद्रुपीकरणाचा निषेध करत कुणाल राऊत यांना घरचाच अहेर दिला आहे. या घटनेची माहिती आम्हाला मिळतात आम्ही प्रशासनाला फोन करून असे कृत्य कोणी केले याची चौकशी करून उचित अशी कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नाही तर ते देशाचे आहेत. ते एका संविधान पदावर बसलेले आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या लोकांचे नागपूर जिल्हा परिषद व काँग्रेसदेखील समर्थन करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदर पोलिस ठाण्याचा अजब कारभारदरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सदर पोलिस ठाण्यातून मात्र वेगळीच भूमिका घेण्यात आली. तेथे १०:३० वाजता फोन केला असता महिला कर्मचाऱ्यांनी फोनवर माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर फोन बराच वेळ तसाच ठेवून दिला. बराच वेळ रिसिव्हर काढून ठेवलेल्या स्थितीत होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात संपर्कच होऊ शकत नव्हता व ‘फोन बिझी’ असल्याचेच दर्शविल्या जात होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी