विमानतळावर पुन्हा हरीण

By Admin | Updated: November 4, 2015 03:00 IST2015-11-04T03:00:08+5:302015-11-04T03:00:08+5:30

मागील महिन्यात राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर डुक्कर आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी

The deer at the airport again | विमानतळावर पुन्हा हरीण

विमानतळावर पुन्हा हरीण

नागपूर : मागील महिन्यात राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर डुक्कर आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीच्या जवळ एक हरीण आढळल्यामुळे खळबळ उडाली. यावेळी इंडिगोची दिल्ली-नागपूर, नागपूर-पुणे आणि सायंकाळी इंडिगोची मुंबई-नागपूर फ्लाईट होती. सुदैवाने हरीण धावपट्टीवर न आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु रेस्क्यू टीमला हरीण सापडले नसल्यामुळे आणखी हा धोका कायम आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी डुक्कर आढळल्यानंतर ‘डीजीसीए’ (डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हीएशन) ने १६ सप्टेबरला विमानतळाची पाहणी केली. या दरम्यान विमानतळ प्रशासनाने यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तरीसुद्धा विमानतळावर मंगळवारी सकाळी ११ वाजता एक हरीण धावपट्टीपासून काही अंतरावर आढळले.
त्यानंतर त्वरित वन विभागाला सूचना देण्यात आली. परंतु रेस्क्यु टीमजवळ चार चाकी वाहन नसल्यामुळे त्यांना पोहोचण्यास विलंब झाला. त्यांनी विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत हरीणाचा शोध सुरु केला. अनेकदा त्यांना हरीण दिसले. परंतु जवळच्या झुडुपात ते निघून गेले. सायंकाळपर्यंत त्याचा लपंडाव सुरू होता.
अखेर रेस्क्यु टीम निघून गेली. बुधवारी पुन्हा हरीण शोधण्याची मोहीम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रशिक्षणाचा अभाव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागाच्या रेस्क्यु टीमला हरीण, माकड आणि इतर प्राणी पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांच्याजवळ साधनांचाही तुटवडा आहे.

Web Title: The deer at the airport again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.