दीपक बजाजला सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST2021-09-10T04:12:51+5:302021-09-10T04:12:51+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून फसवणूक ...

दीपक बजाजला सशर्त जामीन
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून फसवणूक व इतर गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.
बजाजला सत्र न्यायालयाने बोलावल्याशिवाय नागपूरमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच त्याला पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बजाजला हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीदोष इत्यादी आजार असून तो सुमारे पाच वर्षांपासून कारागृहात आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्याची परवानगी दिली होती. बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही विविध अनुदाने स्वीकारत होता, असा आरोप आहे. जरीपटका पोलिसांनी २६ सप्टेंबर २०१५ रोजी बजाज व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४३८, ४७१, १२०-ब, २०१, ४०९, ४६७ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. बजाजतर्फे वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी तर, सरकारतर्फे ॲड. नितीन रोडे यांनी बाजू मांडली.