‘योग आणि साधना’ ऑनलाइन अभ्यासक्रमांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:34+5:302021-02-05T04:47:34+5:30
नागपूर : मातोश्री अंजनाबाई बहुद्देशीय महिला विकास मंडळाच्या वतीने मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या २६व्या स्मृतिदिनानिमित्त ‘योग आणि साधना’ या ...

‘योग आणि साधना’ ऑनलाइन अभ्यासक्रमांचे लोकार्पण
नागपूर : मातोश्री अंजनाबाई बहुद्देशीय महिला विकास मंडळाच्या वतीने मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या २६व्या स्मृतिदिनानिमित्त ‘योग आणि साधना’ या ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे लोकार्पण कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. एम. घारोटे, डॉ. पीयूष जैन, संजय खोंडे, डॉ. ललिता पुनय्या, डॉ. वंदना मेश्राम, डॉ. राजश्री मेश्राम, डॉ. मनीषा हिरेखण आदी उपस्थित होते.
योग आणि मानव यांचे अतूट असे नाते आहे. वर्तमानकाळातील धकाधकीने माणूस अनेक आजारांना बळी पडतो आहे. अशा स्थितीत योग साधना अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत डॉ. श्रीनिवास वरखेडी या वेळी म्हणाले. सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्ष डॉ. ललिता पुनय्या यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सुभाष दाढे यांनी मानले. या वेळी सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम, वैदेही इंगळे उपस्थित होते.
‘’?!