शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:30 IST

लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

ठळक मुद्देलठ्ठपणावर होणार उपचार : मध्य भारतातील पहिला प्रयोग

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून, ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठ होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्यामध्ये शरीराला हालचाली नसणे, बैठीकामे, अधिक उष्मांकाचा आहार यांचा समावेश होतोच, पण अनुवांशिकता आणि शरीराच्या चयापचय क्रि यांतील असमतोल हेही कारणे असतात. लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.विशेष म्हणजे, लठ्ठपणामुक्त महाराष्ट्र हा उद्देश ठेवून प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डेडिकेटेड ओबेसिटी’कक्ष सुरू करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्याची सुरुवात नागपूर मेडिकलमधून झाली.लठ्ठपणा म्हणजे शारीरिक बेढबपणा नाही, तर तो एक रोग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केले आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या लठ्ठपणाच्या समस्येवरचा उपाय म्हणून बेरियाट्रिक शस्त्रक्रिया प्रसिद्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया सुरू असून आतापर्यंत मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर शस्त्रक्रिया झाल्या. आता यात ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्षाची भर पडल्याने शस्त्रक्रियेपूर्वीच्या उपचाराला योग्य दिशा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’भारतात जंक फूड, अल्कोहोल व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’ किंवा ‘ओबेसिटी’ग्रस्त आहे. भारत हा ‘ओबेसिटी’ या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ‘ओबेसिटी’ हा एक आजार आहे, हे लोकांना माहितच नाही. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थरायटिस, कर्करोग, अ‍ॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात.मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात ‘डेडिकेटेड ओबीसीटी’ हे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कक्षात येणाऱ्या लठ्ठ रुग्णांची नोंदणी केली जाईल. लठ्ठपणासह मधुमेह, उच्चरक्तदाब व इतरही आजारांची माहिती घेऊन तीन महिने त्यांच्यावर उपचार करून पाठपुरावा केला जाईल. उपचारानंतरही लठ्ठपणा कमी होत नसेल तर ‘बेरियाट्रिक सर्जरी’साठी रुग्णाला तयार करण्यात येणार आहे.लठ्ठपणा हा एक आजारलठ्ठपणातून येणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांना बहुसंख्य लोक तोंड देत आहेत. लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्याच कारणांवर ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षात उपचार केले जाईल. या कक्षासाठी स्वतंत्र कक्ष व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर