ग्रामीण भागातील संक्रमणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:34+5:302021-05-24T04:08:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा/उमरेड/सावनेर/काटाेल/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण हळूहळू कमी हाेत असून, रविवारी जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात ...

ग्रामीण भागातील संक्रमणात घट
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा/उमरेड/सावनेर/काटाेल/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण हळूहळू कमी हाेत असून, रविवारी जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात २३ रुग्णांची, तर उमरेड तालुक्यात २२, सावनेर तालुक्यात १३, काटाेल तालुक्यात १०, कळमेश्वर तालुक्यात सात आणि रामटेक तालुक्यात तीन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. काेराेनाचे घटते संक्रमण समाधानाची बाब असली तरी नागरिकांनी उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करणे व काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
हिंगणा तालुक्यात रविवारी ३९ नागरिकांच्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, यात २३ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नव्याने पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील दहा रुग्णांसह कान्होलीबारा येथील १५, सुकळी (बेलदार) येथील चार, भारकस व टाकळघाट येथील प्रत्येकी तीन, डिगडोह, वडधामना, इसासनी व मोंढा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या २३ रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णसंख्या ११,७३७ झाली असून, यातील १०,६९४ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे.
उमरेड तालुक्यात रविवारी २२ नवीन रुग्णांची भर पडली. यात उमरेड शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. सावनेर तालुक्यात १३ नवीन रुग्ण आढळून आले असून, यात सावनेर शहरातील दाेन, तर ग्रामीण भागातील ११ रुग्ण आहेत. काटाेल तालुक्यात रविवारी २१९ नागरिकांच्या काेराेना टेस्टचे रिपाेर्ट प्राप्त झाले. यात दहा जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या दहा रुग्णांमध्ये काटाेल शहरातील तीन तर ग्रामीण भागातील सात रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील या सात रुग्णांमध्ये पाच रुग्ण काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या, तर दाेन रुग्ण येनवा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील आहेत.
काेराेना रुग्णांमध्ये आघाडीवर असलेल्या कळमेश्वर तालुक्यात रविवारी सात नवीन रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील दाेन तर ग्रामीण भागातील पाच रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील पाच रुग्णांमध्ये घोराड येथील दाेन, गोंडखैरी, सावंगी, खैरी (हरजी) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. रामटेक तालुक्यात तीन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून, रामटेक शहरात एकाही नवीन रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, तालुक्यातील केवळ १३ नागरिकांचे रिपाेर्ट रविवारी प्राप्त झाले. तालुक्यात आजवर काेराेनाचे एकूण ६,४७८ रुग्ण आढळून आले असून, यातील ६,१९९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरीत्या दिली.