विदर्भात चाचण्या व रुग्णसंख्येतही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:04+5:302021-03-09T04:10:04+5:30
नागपूर : विदर्भात कोरोना संसर्गाबाबत चिंता वाढली असताना सोमवारी चाचण्यांच्या संख्येत मोठी घट आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

विदर्भात चाचण्या व रुग्णसंख्येतही घट
नागपूर : विदर्भात कोरोना संसर्गाबाबत चिंता वाढली असताना सोमवारी चाचण्यांच्या संख्येत मोठी घट आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी ३१ हजारांवर गेलेल्या चाचण्या आज १७,७४५ झाल्या. परिणामी, रुग्णांची संख्याही कमी झाली. २,८३२ नव्या रुग्णांची भर पडली तर, ३१ रुग्णांचे जीव गेले. नागपूर जिल्ह्यात १,२७६ रुग्ण व ११ मृत्यू नोंदविल्या गेले. अमरावतीमध्ये ४६५ रुग्ण व ७ मृत्यू झाले. विशेष म्हणजे, आज बुलडाणा जिल्ह्याने दैनंदिन रुग्णसंख्येत अमरावती जिल्ह्याला मागे टाकले. ५१७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. वाशिममध्ये १३८, अकोल्यात ११३, यवतमाळमध्ये १५१ तर वर्धेत ५७ रुग्ण आढळून आले. दिलासादायक म्हणजे, मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा अधिक ३११५ रुग्ण बरे झाले.
विदर्भातील सोमवारची स्थिती
जिल्हारुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर १,२७५ १,५९,००५ ११
चंद्रपूर ३८ २४,२४० ००
गोंदिया २५ १४,५७० ०१
यवतमाळ १५१ १९,४२५ ०४
भंडारा ४६ १३,९७५ ००
वाशिम १३८ १०,३५८ ०१
वर्धा ५७ १३,५७२ ०५
गडचिरोली ०७ ९,६९९ ००
अकोला ११३ १९,२३३ ०१
बुलढाणा ५१७ २१,८२१ ०१
अमरावती ४६५ ३९,९८६ ०७