परीक्षा शुल्क कमी करा
By Admin | Updated: July 1, 2015 03:05 IST2015-07-01T03:05:13+5:302015-07-01T03:05:13+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या तुलनेत जास्त परीक्षा शुल्क आकारण्यात येते.

परीक्षा शुल्क कमी करा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या तुलनेत जास्त परीक्षा शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर धडक दिली व प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. कुलगुरूंना कार्यकर्त्यांनी निवेदनदेखील दिले.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकाल उशिरा लागले तर प्रवेशदेखील उशिराच होतात. याचा परिणाम ‘अॅकेडमिक कॅलेंडर’वर होतो व अनेकदा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कदेखील भरावे लागते. शिवाय परीक्षा शुल्कामुळे सामान्य व गरीब विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका बसतो. त्यामुळे निकाल लवकर लावण्यात यावे व परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जर कुलगुरू निकाल लवकर लावण्यात अपयशी ठरले तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी संतप्त प्रतिक्रियादेखील कार्यकर्त्यांनी दिली.
निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू असून परीक्षा शुल्काचा मुद्दा प्राधिकरणांसमोर मांडावा लागेल असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पीयूष आकरे, कारण शाहू, शरद आकरे, फैझ अन्सारी, धीरज अगासे, प्रभात अग्रवाल, प्रतीक नीरे, सुयोग वानखडे, लोकेश शाहू, असित अन्सारी, प्रिया अहुजा, सोनू फटिंग, हेमंत, प्रियांका आकरे, राजेश शेवळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)