डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

By Admin | Updated: September 11, 2014 01:08 IST2014-09-11T01:08:05+5:302014-09-11T01:08:05+5:30

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.

Decrease in diesel use - noise pollution will also decrease | डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण : नागपूर विभाग साजरे करतेय रजत जयंती वर्ष
नागपूर : मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.
विभागात १९८३ मध्ये विद्युतीकरणाला सुरुवात झाली. विभागात पहाडी भागात हेलिकॉप्टरच्या साह्याने विद्युत खांब बसविण्यात आले. विद्युतीकरणाचे कठीण काम पूर्ण करताना विभागात नागपूर-वर्धा-बल्लारशा भागात ११ सप्टेंबर १९८९ ला रेल्वेगाडी क्रमांक २६१५ जीटी एक्स्प्रेस ही पहिली विद्युतीकरण झालेली गाडी धावली. सप्टेंबर १९८९ मध्ये नागपूर-वर्धा-बल्लारशा या ४४० किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर वर्धा-बडनेरा २३१ किलोमीटरच्या खंडात १९९१ मध्ये नागपूर ते इटारसी ही ५७३ किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन १९९१ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या खंडाचे दुहेरीकरण, ब्रॉंच लाईन, साईडिंगमध्ये विद्युतीकरण झाले. सप्टेंबर २०१४ पर्यंत १७४१ रेल्वे किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण होऊन तेथे विद्युत इंजिन धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामासाठी १४ ट्रॅक्शन सब स्टेशन कार्यरत आहेत. विद्युतीकरणाचे नेटवर्क नागपुरातील सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अ‍ॅक्विझिशन तंत्रज्ञानाने करण्यात येते. विद्युत इंजिनच्या देखभालीसाठी २२ सप्टेंबर १९९० रोजी अजनीत विद्युत लोकोशेडची स्थापना करण्यात आली. या विद्युत लोकोशेडमधून पहिले इंजिन २२ आॅक्टोबर १९९० ला सुरू झाले. अजनी विद्युत लोकोशेडमध्ये १९८९ मध्ये ५ विद्युत लोको होते. आता ही संख्या २०१४ मध्ये २०० झाली आहे. अजनीच्या विद्युत लोकोशेडमध्ये डब्लुएजी ५ (३८५०), डब्लुएजी ७ (५००० एचपी), डब्लुएएम ४ (३६४० एचपी), डब्लुएपी १ (३७६०), डब्लुएपी ४ (५००० एचपी), एसी/डीसी डब्लुएसीएम ३ (५०००/४७०० एचपी) या इंजिनचा समावेश आहे. यासोबतच ३ फेज विद्युत इंजिनमध्ये डब्लुएपी ५ (५४४० एचपी), डब्लुएपी ७ (६३५० एचपी), डब्लुएजी ९ (६००० एचपी) या विद्युत इंजिनची देखभालही करण्यात येते. विभागात विद्युतीकरणानंतर रेल्वेची वजन क्षमता १७ ते २४ डब्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून वेळेची बचतही होत आहे. विद्युतीकरणामुळे मालगाड्यांची क्षमताही २३०० टन ते ५३०० टनपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ५१ टक्के डिझेलची बचत झाली असून विभागाला डिझेलच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ४२० कोटींचे वीज बिल भरावे लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Decrease in diesel use - noise pollution will also decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.